सुस्वागतम! , श्रीनाथ गोंधळी पथक,फलटण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली कला ही सांकेतीक चिन्हांचा वापर करून गुप्तहेर खात्या पर्यंत पोहचवण्याचे काम गोंधळी करत होते, तीच कला आज पर्यंत आम्ही जोपासली आहे. या माध्यमातून गावोगावी आम्ही जागरण गोंधळ सादर केलेले आहे. वडीलोपार्जित चाललेला हा वसा आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. आम्ही सर्व एकत्रित उत्साहाने , आनंदाने असे कार्यक्रम राबवत असतो .

कार्यक्रमाचे सादरीकरण व पारितोषिके


१.  लोककला मंच काजड शिंदेवाडी, इंदापूर बारामती

   शाहीर व लोक कलावंत मेळावा २०१५.


२.  सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शाषण व वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने  सांस्कृतिक मोहोत्सव,पुणे मार्च -२०१५.


३.  भीमथडी जत्रा कृषी महाविद्यालय मैदान सिंचन, नगर शिवाजी नगर पुणे २००९ ते २०१५


४.  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी सलग्न. श्री स्वामी समर्थ कृषी विकास 

     व संशोधन चारिटेबल ट्रस्ट, दिंडोरी जिल्हा - नाशिक  जागतिक कृषी मोहोत्सव...


५.  भटक्या जाती जमाती महासंघ - पुणे  गौरव पत्र -२००७.

 

६.  वसुंधरा वाहिनी  कामुनीटी रेडीओ बारामती १५ जुलै २०१०. 


७.  पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त - मावळ वैभव महायात्रा २०१३ प्रशस्ति पत्रक 

 

अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी महासंघ तालुका- फलटण, जिल्हा- सातारा 
अध्यक्ष -  अमोल यशवंत पवार ,  फलटण         (9850989283)
खजिनदार - रविंद्र चंद्रकांत  साळुंखे , फलटण        (9130934134)
सदस्य - बाळासाहेब जगन्नाथ  जाधव, बारामती    (9763603221)
कला अध्यक्ष- राहुल काशिनाथ पवार, पुणे शहर    (9850813437)


|| कला हेच जीवन ||
आमच्याकडे भराड, गोंधळ (देवीचा आणि नाथाचा), लग्न, मुंजीचा गोंधळ, खंडोबाचे जागरण, नाथांचे  डवर पूजा इ. धार्मिक विधी केले जातील.  तसेच फेस्टिवलचे कार्यक्रम, वाढदिवसाचे कार्यक्रम, देवीची, शिव जयंती तसेच गणेश उत्सव, मिरवणूक आणि गोंधळी कला इ. कार्यक्रम केले जातील. 
१) अमोल य. पवार          (9850989283)
२) रविंद्र चं. साळुंखे         (9130934134)
३) बाळासाहेब ज. जाधव   (9763603221)


कार्यक्रमाचे महत्व व त्याचा अर्थ :

 • नाथ संप्रदाय

  नाथ संप्रदाय : एक भारतीय शैव संप्रदाय. या संप्रदायाचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव याच्यापासून झाला, अशी सांप्रदायिकांची समजूत असल्यामुळे, याला नाथ संप्रदाय म्हणतात. ‘नाथ’ म्हणजे रक्षण करणा रा, स्वामी व नाथ संप्रदाय म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा संप्रदाय होय. नाथयोगी ‘नाथ’ परमेश्वर हे परमपद मानून ते मिळविण्यासाठी योगाचरण करतात. संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर साधक आपल्या नावापुढे ‘नाथ’ ही उपाधी लावतात. योगमार्गाने सिद्धावस्था किंवा अवधूतावस्था प्राप्त करणे, हे या पंथाच्या अनुयायांचे ध्येय असल्यामुळे हा पंथ योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय आणि ⇨अवधूत संप्रदाय या नावांनी ओळखला जातो. तसेच त्याला दर्शनी (‘दर्शन’ कर्णकुंडल धारण करणारा), गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय [→कानफाटे], गुरू संप्रदाय इ. नावेही आढळतात; परंतु नाथ संप्रदाय वा नाथ पंथ हेच नाव अधिक रूढ आहे.

  आदिनाथ शिव हे संप्रदायाचे मूळ प्रवर्तक असले, तरी त्यांचे शिष्य ⇨मच्छिंद्रनाथ (मत्स्येंद्रनाथ) हेच संप्रदायाचे पहिले मानवी गुरू होत. संप्रदायाला नावारूपाला आणण्याचे खरे श्रेय मात्र गोरख (क्ष)- नाथांनाच द्यावयास हवे. मत्स्येंद्राचा गुरुबंधू जालंधर आणि जालंधराचा शिष्य कानिफनाथ यांनाही संप्रदायात मोठी मान्यता होती. संप्रदायाचा उगम कदलीबनात झाला, असे अनेक जण मानतात; परंतु हे कदलीबन कोठे होते, याविषयी मात्र मतभेद आहेत. संप्रदायाचे उगमस्थान म्हणून हिमालय, नेपाळ, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल, महाराष्ट्र, आंध्रमधील श्रीशैलम् पर्वत इ. स्थाने वेगवेगळ्या विद्वानांनी सांगितली आहेत.

  तत्त्वज्ञान व साधना : शंकराने पार्वतीला सांगितलेले तत्त्वज्ञान मच्छिंद्राने मासोळीच्या पोटातून ऐकले व तेच पुढे मानवांना प्राप्त झाले, अशी आख्यायिका ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी सांगितली आहे. मच्छिंद्राने समाजाच्या प्राथमिक अवस्थेपासून चालत आलेला सुफलता विधी म्हणजे योगिनी कौल मार्ग व नाथ संप्रदाय या दोहोंचे एकीकरण केले. मच्छिंद्रांच्या ग्रंथांतून प्रामुख्याने योगमुक्त कौल मार्गाचे विवेचन आहे, तर गोरखनाथांच्या सिद्धसिद्धांतपद्धतीमध्ये नाथ संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची चर्चा आहे.

  जागरण गोंधळ

  घर तेथे घराणे, घराणे तेथे कुळ, कुळ तेथे कुळधर्म कुलाचार हा पाळलाच पाहिजे हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये 'जागरण' प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे. आज धावपळीच्या जगामध्ये जागरण हा शब्द रात्रभर जागणे यापुरता मर्यादित स्वरुपात पाहिला जातो परंतु जागरण या शब्दाचा अर्थ जागृत करणे होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी जागृत करणे म्हणजे जागरण.

  -- लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळहा कार्यक्रम ठेवतात. या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवतांचे नाव घेतात.त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्न दान केले जाते.

  महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात किर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेली आहे. विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

  अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते.

  आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

  उदा. अंबे जोगवा दे जोगवा दे माय माझ्या भवानी जोगवा दे । हे जसे भक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे- मी मिरचीचे भांडण । एका रोज खटखटीन जी ॥ मिरची अंगी लईच ताठा । म्हणतिया मी हाई तिखटजी ॥ असे विनोदी गीतही सादर केले जाते. उदा. रत्नागिरी ज्योतिबा । गोंधळा या हो । तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो। पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।

  असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो. संत एकनाथांनी - द्वैत सारूनि माळ मी घालिन। हाती बोधाचा झेंडा मी घेईन। भेदरहित वारीस जाईन। असा जोगवा मागितला. असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते.

  ज्योतिबा

  दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्म शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. दख्खनचा राजा श्री.जोतिबा, श्री कात्यायनी देवी ,नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणे विशाळगड दर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे.त्यामुळे कोल्हापूरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे.

  या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द आहे.समुद्रसपाटीपासुन सुमारे ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व एतहासिक एश्वर्यात मोलाची भर घालणा-या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आ स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका . वाडी रत्नागिरी

  डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असुन , सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९‍ लोक गुरव समाजाचे आहे.देवताकृत्य तसेच नारळ,गुलाल व मेवामिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे.सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे.

  त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो,तोच जोतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिध्द असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे. श्री जोतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेच रूप आहे.ब्रम्हा,विष्णू,महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळुन एक ते ज्ञ पुंज अवतार म्हणजेच जोतिबा किंवा केदारनाथ जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शव्दापासुन झाली असुन ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू,तेज,आप(पाणी) आकाश व पृथ्वी। या पंचमहाभूतांपैकी ते जाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा जोतिबा।।

  श्री सिध्दनाथ

  शीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो; म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे अन् जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मीदेवी असेल, तर श्री महालक्ष्मीदेव्यै नम: । असा नामजप करावा. विवाहित

  स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्री विष्णु,शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

  श्री क्षेत्र काळ भैरवनाथ

  श्री शंकराच्या आज्ञेवरुन काळभैरव काशीवरुन सोनारीकडे निघाले. सोनारीला जाताना ते याच दंडकारण्यातून चालले होते. जाता जाता ते एका झाडाखाली बसले. त्या ठिकाणी (सध्याचे आगडगाव) काही गुराखी मुलं आपली गुरे चारत होती. दुपारी जेवणाची वेळ होती मुले आपापली शिदोरी सोडून जेवणास बसले. त्यातील एका मुक्या मुलाचे लक्ष श्री भैरवनाथांकडे गेले. त्यानी आपल्या मित्रांना हातवारे करुन सुचविले की नाथांना जेवणासाठी बोलवा, परंतु इतर मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या मुलाने आपली शिदोरी नाथांसमोर ठेवली व जेवणाचा आग्रह केला. नाथांनी त्या मुलांमध्ये जेवण केले. ते तृप्त होऊन मुलांवर प्रसन्न झाले व त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या मुक्या मुलाला वाचा फुटली. तो अत्यानंदित होऊन बोलू लागला. या ठिकाणी पाणी नव्हते म्हणून नाथांनी तेथे त्रिशूल रोवला. तसा पाण्याचा उगम झाला मंदिराच्या जवळच असलेल्या या तलावावर त्रिशुलबा हे दैवत आहे.

  देवाने आग्रह केल्यानंतर त्या मुक्या मुलाने वर मागितला, की कायम तुमचे दर्शन व्हावे म्हणून या ठिकाणी थांबावे. त्यानुसार नाथांनी तथास्तू म्हटले व याच गावात थांबेन असे वचन दिले तसेच मला जेवण मिळालेल्या या भूमीत जो अन्नदान करील, त्याचे दुःख नाहीशे होतील, येथे केलेले अन्नदान मी आनंदाने ग्रहण करील असा वर दिला. (ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन ट्रस्टने सध्या देवस्थानाजवळ बाजरीची भाकरी व आमटी असा महाप्रसाद सुरु केला आहे.)

  त्यानंतर नाथांनी राक्षसांकडून एकाच रात्रीतून मंदिर बांधून घेतले. त्या राक्षसांनी मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना करुन गंगास्नान घातले. आगडमल, देवमल, रतडमल अशी या तीन राक्षसांची नावे आहेत. त्यांच्या नावांवरुनच आगडगाव, रतडगाव व देवगाव ही तीन गावे ऐकमेकांपासून प्रत्येकी ४ कि.मी अंतरावर वसलेली आहेत. (मंदिराच्या प्रथम दरवाजावर तीन दगडी राक्षसी मुंडके बसविलेले आहे ते या कथेची साक्ष देतात.) सध्या ही तीनही गावे अत्यंत डोंगराळ प्रदेशात असूनही समृध्द आहेत.

  श्री भैरवनाथांना शंकराच्या आज्ञेवरुन पुढे सोनारीला जाऊन आपले कर्तव्य करावयाचे होते. ब्रह्मदेवाचा दैत्यांना वर होता, की अविवाहिताच्या हातून मृत्यू नसावा. त्यांच्या रक्ताच्या एका थेंबातून अनेक राक्षस निर्माण होतील, त्यामुळे भैरवनाथांना विवाह करणे आवश्यक होते. ठराविक घटकेत लग्न केले, तरच मी थांबेन, या अटीवर श्री भैरवनाथांचा विवाह आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीशी ठरला; परंतु अटीप्रमाणे लग्न कोंबडा अरवण्यापूर्वी न झाल्याने ते पुढे निघून गेले. पुढे जोगेश्वरीने सोनारपासून तीन कि.मी अंतरावर असलेल्या मुख्याग्राम (मुगाव) येथे शेषाच्या पोटी योगिनीचा अवतार धारण केला व चैत्र वद्य अष्टमीस रात्री बारा वाजता श्री भैरवनाथांचा देवी योगेश्वरीशी (जोगेश्वरी) विवाह झाला. लग्नांनतर श्री भैरवनाथांनी दैत्यांचा संहार करण्यास सुरुवात केली. दैत्यांवर वार केल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षसांची निर्मिती होऊ लागली. त्यावेळी श्री भैरवनाथांनी शंकिनी, कंकनी, डंकिनी अशा चौषष्ट योगिणींची आराधना करुन घेतले. दैत्यांबरोबरच युध्दात या योगिणींनी आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. दैत्यांबरोबरच युध्दत या योगिणींची दैत्यांचे रक्त जमिनीवर पडू न देता ते प्राषाण केले आणि नंतर श्री भैरवनाथांनी दैत्यांचा संहार केला. युध्द थांबल्यानंतर शस्त्र धुण्यास पाणी नव्हते म्हणून नाथांनी त्रिशुल रोवला व त्याठिकाणी पाणी निघाले. आजही ते स्थान लोहतीर्थ म्हणून ओळखले जाते. श्री भैरवनाथांनी राक्षसांचा नाश केला याचा आनंदोत्सव म्हणून सोनारी येथे चैत्र वद्य अष्टमीस सहा दिवसाची मोठी यात्रा भरते.

कार्यक्रम

 

भराड

 

गोंधळ (देवीचा आणि नाथाचा)

 

खंडोबाचे जागरण

 

लग्न

 

मुंजीचा गोंधळ

 

नाथांची डवर पूजा

 

फेस्टिवलचे कार्यक्रम

 

वाढदिवसाचे कार्यक्रम

 

फेस्टिवलचे कार्यक्रम

 

शिव जयंती

 

गणेश उत्सव

 

देवीची,मिरवणूक ,गोंधळी कला

चित्रफिती

संपर्क

१) अमोल य. पवार (9850989283)
२) रविंद्र चं. साळुंखे (9130934134)
३) बाळासाहेब ज. जाधव (9763603221)
४) राहूल का. पवार (9850813437)

कार्यक्रम

भराड,गोंधळ (देवीचा आणि नाथाचा),लग्न,मुंजीचा गोंधळ,खंडोबाचे जागरण,नाथांचे डवर पूजा, फेस्टिवलचे कार्यक्रम,ाढदिवसाचे कार्यक्रम,देवीची,शिव जयंती , गणेश उत्सव,मिरवणूक , गोंधळी कला

संपर्क

Email:
shrinathgondhalipathak123@gmail.com
jadhav2balasaheb@gmail.com
salunkhe1ravindra@gmail.com
rahulpawar2398@gmail.com